विंदा - अनुग्रह



 *'विंदायांचा अनुग्रह का ?*


काल आम्हीं विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या कार्यक्रमाला गेलो होतोत्यांच्या मुलीने - सौ जयश्री काळे यांनी विंदांच्या काही निवडककविता सादर केल्या - आम्हीं रसग्रहण केले कारण जयश्री ताईंच्या टिपण्या विशेष होत्याकवितेतील भाव उमलत गेले - त्या मुळेआम्हांला कविता 'समजतगेल्याविंदा लहानपणापासून कविता करत - असं सांगून - ताईंनी तीन बाल कविता सादर केल्या


बहुदा त्या उल्काला जास्त भावल्या असाव्यातकाल रात्री तिने एक कवितेला जन्म दिलावेळ एक वाजून चवदा मिनिटेविषय - चांदोबासाठी उलटल्यावर 'स्त्री वेदना / स्त्री मुक्तीया विषयावर स्वानुभवावर कविता लिहिणारी उल्का अचानक 'बालपणावरगेलीयाचा अर्थ कवी चा 'कोणत्याही काळातमुक्त संचार करण्याची क्षमता किती जबरदस्त आहे हे समजतेमला जीवनाविषयी गूढ चिंतनकरणाऱ्या कविता जास्त आवडतातपण हे 'बाळसुद्धा आवडलं


*चांदोमामा (बालकाव्य)*


*आकाशातल्या चांदोमामा

कधी येशील माझ्याजवळ

रोजच बघतो तुला दुरून

वाटते यावे तुझ्याजवळ


जरी दूर तरी तुझ्यावर

आईचे प्रेम जीवापाड

अमावस्येला होतोस 

लबाडा का नजरेआड


नको असा गायब होऊ

कासावीस होतो जीव

उपाशीच रहाशील

म्हणून येते तुझी कीव


रोजच तुझ्या संगतीने

पोट माझे खूप भरते

दुपारी काऊचिऊ संगे

पानात काही ना उरते


पौर्णिमेला मी मात्र

खूप खुश असतो

चांदणचूऱ्याची रात्र

तू चांदीचाच भासतो


अस्सा माझा चांदोमामा

मला खूप खूप आवडतो

पण दूर दूर राहून मात्र

मला खूप का रडवतो*


*✍️ उल्का मानकर

२१//२२। रात्र .१४ मिनिटे*


अनुग्रह म्हणजे काय? - 'विद्या पूर्ण झाल्यावर ती विद्या फलद्रूप व्हावी म्हणून गुरूंकडून मिळालेला आशीर्वाद म्हणजेच अनुग्रह होय


काल विंदांचा कार्यक्रम - गुरु मिळाला - कविता सुचली - शब्द नाचू लागले - तुमच्या आमच्या मनातील भावना शब्दात आल्या - उल्काकडूनअन्यथा 'छंदाकडे , चंद्राकडे कोण एवढं बारकाईने बघतं


*नेमेचि येते अमावस्या आणि पौर्णिमा;

आम्हांस स्वारस्य नसे तयात ;

कवी आहे ना मश्गुल रसग्रहणात ;*


अरे मला सुद्धा - कविता येते ? विनोद हो ! 


उल्कास 'असंख्यगुरु मिळोतिचा अनुग्रह वाढो - आज जेष्ठांचा दिन आहेखूप शुभेच्छा तिला

0/Post a Comment/Comments