लिंक म्हणजे 'दुवा'
 *लिंक म्हणजे 'दुवा'*


हल्लीचं जग मोठया प्रमाणावर जोडलेलं आहेइतकं कि एक थिअरीसिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन सांगते की सोशल मीडियावर ... Six degrees of separation is the idea that all people are six or fewer social connections away from each other. As a result, a chain of "friend of a friend" statements can be made to connect any two people in a maximum of six steps


आजही मी एकाला दुसऱ्या दोन जणांशी जोडलं आणि सहा स्टेप्स थिअरी वास्तवात आणण्यास मदत केलीकिस्सा मजेशीर आहे


*ऑक्टोबर २०२०*

रशियाच्या मॉस्को ऐअरपोर्टवरसामानाच्या बेल्ट जवळएक तिशीतला भारतीय भेटलाचौकशीअंती कळलेकी तो अहमदनगर येथीलभारतीय आहेमग पुढील तीन दिवस आमची खूप सॉलिड मैत्री झालीत्याने मला 'मॉस्कोया अति सुंदर शहराचा 'शोध - एक्सप्लोरघेण्यास  खूप मदत केलीत्याला रशियन येत असल्याने तो माझा गाईड झाला होतात्याच्या शिवाय मला मॉस्को 'सखोलबघता आलेनसते कारण भाषेचा अडसर खूप मोठा आहेविनय तेथील पेट्रोलियम कंपनीत काम करत होताविनयचं लग्न झालेलं होतं पण विनयआईचं 'लेकरूहोता हे त्याच्या सानिध्यातून जाणवलंअसोतीन चार दिवसानंतर मी युरोपकडे प्रयाण केलेविनायमुळे 'रशिया भेटजास्त फलद्रुप झालीविनायबरोबरचं नातं उमललं आणि ....


*नोव्हेंबर २०२०*

मी आणि राजानॉर्वे - ओस्लो येथे हॉस्टेलमध्ये चेक इन करत होतोह्या हॉस्टेल मध्ये रूमवर स्वयंपाक करण्यास भांडी मिळतातमीराजाला सांगत होतो 'दोन ताटल्यादोन चमचेएक छोटं एक मोठं भांडअन दोन वाट्या घे'. आमचं संभाषण मराठीत मोठ्याने चाललंहोतंआम्हीं मोठ्याने बोलत असल्याने 'युरोपियन शांततेचाभंग झाला होता पण ' who cares ' या 'अटीट्युडमुळे आम्हीं बिनधास्तहोतोतेव्हढ्यात एक तिशीतला मुलगा माझ्या जवळ आला आणि विचारता झाला 'मराठी का?'. मी आश्चर्याने 'होम्हणालो आणि मग.... मग कायअनिल आणि सुनीलजुळे भाऊ आमच्या रूमवर आले आणि गप्पांचा पाऊस पडलाते दोघंही भारतीय दुबईत राहतातलिमिटेड भांड्यांमध्ये 'शिजवलेल्याआणि भाज्यरहित 'नूडल्सआम्हीं आवडीने खाल्ल्यापरत गप्पादुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नातंउमलत गेलं आणि .......


*वर्ष २०२१ - २०२२ - करोनामय*

या काळात एकदा दोनदा व्हाट्स अप वर हायहाऊ आर यू ? झालंविनय पुण्याला परतला होताबहुदा जॉब गेला होताअनिल सुनीलदुबईत मजा करत आहे


*२७.०८.२०२२ : म्हंजे परवा*

विनयचा व्हाट्स अप चॅट पहिलातो सध्या दुबईत आहेआठवड्या पूर्वी पोहचलादुबई म्हणजे 'मजाअसं आपण जे गृहीत धरलेलंअसतं तसं काही नव्हतंतो सांगत होता 'Just feeling alone and depressed so need some motivation'. आईशी बोलणंझालं 'My mother called me hour ago and asked ‘करमत आहे का ? ’ so ....'. 


मग नंतर मी त्याच्याशी अर्धा तास चॅट केलंत्याला मोटिव्हेशन दिलेत्याला सांगितले कि 'खिशात पैसे असले कि डिप्रेशनला वाव देऊनकोआईलाबायकोला सांग 'मजेत आहे' - म्हणजे त्या काळजी करणार नाहीतुझे हे दिवस निघून जातीलयानंतर त्याला मी दुबईस्थित अनिल सुनिलचे फोन नंबर त्यांना  विचारता दिलेविनयला सांगितलं 'बिनधास्त कॉन्टॅक्ट कर अन पाहिजे ती मदत मगतुझेप्रॉब्लेम ते सोडवण्यास ते मदत करतील’. माझ्याशी बोलून त्याला बरं वाटलंडिप्रेसड माणूस शब्दांचा 'भुकेलाअसतो हे मी सौदीतअनुभवलं आहेतेथील वातावरण विचित्र असतं आणि म्हणून चांगल्या माणसाचीमित्र नसतील तरमानसिकता बिघडते हा स्वानुभवविनयला सांगितलं 'मला केव्हांही फोन करआणखी मित्रांचे नंबर देईनअन चॅटिंग संपवलं


*३०--२०२२ म्हणजे आज*

सकाळी सकाळी विनयने व्हाट्स अप केलंसांगतोय 'अनिलने मला मराठी ग्रुप मध्ये ऍड केलंताबडतोब मला अपार्टमेंट मिळाले सुद्धा. All is good Sir. थँक्स सर'. मला 'गुड फीलिंगआलेविनय आता लवकर सेटल होईलनवे मित्रनवी उभारी. There is no question of depression now. Only US Dollars 💸एकदा का बायको आली की .....


सोशल मीडिया वर प्रत्येक सहावा माणूस कनेक्टेड आहेआत्ता नाही का मी .... नवीन कनेक्शन प्रस्थापित केलेबाप्पा मोरया


गंमत म्हणून स्क्रीन शॉट्स बघा

0/Post a Comment/Comments