फार पूर्वी नाही ....


 *फार पूर्वी नाही ...*


साधारण १९६५ सालगंपती म्हणजे काय हे कळायला सुरवात झाली असेल तेव्हांफार पूर्वी म्हणजे जेंव्हा नासिक एक गाव होतंम्हणजे ते शहर नव्हतेतेंव्हागंपती जवळ आला की माझे वडील ट्रान्झिस्टर्स असलेला मोठ्ठा रेडिओ जेथे आम्हीं ठेवायचो ती रॅकरिकामी करायचे आणि स्वच्छ करीतम्हणजे वर्षभराची धूळ हटवली जातमागच्या वर्षाच्या सजावटीच्या खुणा नीट 'पुसायचेहाअट्टाहासमग आदल्या दिवशी आण्णा 'खळतयार करायचेडिंकाची बाटली तेंव्हा त्यांना महाग वाटायचीआम्हीं सजावटीसाठी'घोटीव कागदवापरायचो कारण तो चकाकणारा बेगडी कागद महाग होताघोटीव कागदाच्या पट्ट्या उरल्या कि मी सांभाळून ठेवतअसेदुसऱ्या दिवशी 'भिरभिरंतयार करायला आणि गंपती च्या मागे लावायालारॅक सजली की मन प्रसन्न व्हायचंनंतर अण्णांनी एकबल्बची माळ आणली होतीबरेच वर्षे ती टिकलीजसं जसं मी 'मोठाहोत गेलो तशी तशी मी सजावटीची जबादारी घेऊ लागलोमाझ्या कलेच्या आविष्काराची सुरवात गंपती समोर झालीफार पूर्वी नाही ...


गंपती बसायच्या दिवशी मी आणि आण्णा 'गावातजायचो - सायकलवर - पुढच्या दांडीवर बसूनबऱ्याच वेळा भाद्रपदात पाऊसअसायचानाशकात तेंव्हा सरकारवाड्याजवळच्या गल्लीतच गंपती मिळायचेसाधारण वीतभर उंचीचा - सहा इंचापर्यंत - आमच्याघरात वर्षभर असायचाडेकोरेशन मध्ये दोन गंपतीएक जुना अन एक नवाजुन्या गंपतीचे विसर्जन व्हायचेनवे गंपती एका विशिष्ठजागी ठेवले जायचे - येता जाता ते दिसायचेमग आपसूक 'नमस्कारव्हायचामला बाप्पा देवघराऐवजी मोकळ्यावर ठेवलेलेआवडतात - कारण त्यांची दृष्टी आपल्यावर कायम असावी - देवाला नमस्कार नाही केला तरीएकदा गंपती 'बसलेकी घरात पाहुणाआल्यासारखं वाटायचंआरती आणि प्रसाद - अलौकिक आनंदपण मला ती 'सर्व भाज्यांची भाजीअजिबात आवडत नसेकेवड्याचेफुल मात्र आवडायचेआमच्या कॉलनीत प्रोफेसर पंडित कार्यक्रम आयोजित करायचेसर्वात प्रथम सुधीर फडके यांचं गीतरामायण मीगंपती उत्सवात ऐकलंशामची आई हा सिनेमा मी उत्सवात बघितलामंगेश पाडगावकर मी उत्सवात ऐकले आहेबौद्धिकही व्हायची - पण विषय आता आठवत नाहीदहा दिवस वातावरण सात्विक असेपूर्वी 'देखावेदेखणे असायचेसार्वजनिक गंपती 'वर्गणीतूनसाकार होतफार पूर्वी नाही ....


विसर्जनाच्या दिवशी वेगळी गडबडवेगळी हुरहूरतीन वाजता आम्हीं आमच्या विहिरीत जुन्या बाप्पांचं विसर्जन करायचोमूर्ती खालीगेली की वर येणारे बुडबुडे मला अजूनही आठवतातत्या विहिरीत कासव होते - आई सांगायची - तुझ्या जन्माच्या अगोदर पासून आहेते विहिरीतमग मी आणि बहीण अण्णांबरोबर मिरवणूक बघायलाठरलेला स्पॉट - मेहेर हॉटेललेझीमदानपट्टाढोल असे खेळबघायला मज्जा यायचीगुलाल उडवला जायचामिरवणुकीत सात्त्विकता होतीभिभत्सपणा नव्हताचदारू प्यालेला माणूस लगेचओळखू यायचावाकडी बारव वरून दुपारी तीन वाजता सुरु झालेली मिरवणूक पहाटे बारा ते तीन च्या दरम्यान संपलेली असायचीआम्हीं जेंव्हा मोठे झालो तेंव्हा मित्रांबरोबर उलट्या दिशेने मिरवणूक चालायचोफार पूर्वी नाही ....


लोकमान्य टिळकांशिवाय कोणालाही गंपती उत्सवाचं महत्व कळलं नव्हतंवॉर्डातील नगरसेवक कधीही सक्रिय नसायचेउत्सवालाराजकीय धार नव्हतीसमाज स्वतःहून सामील व्हायचाफार पूर्वी नाही ....


*हल्ली मात्र प्रदूषण फार वाढलंयप्रत्येक गंपती राजकीय झालाभ्रष्ठाचारातून आलेला पैसे देऊन नगरसेवक 'गंपतीविकत घेतातनकळत 'पक्षाचंलेबल बरोबर येतं - मंडपात झेंडे दिसतातबऱ्याच ठिकाणी - मंडपाच्या मागच्या बाजूला 'दारूकामचालतंभ्रष्ट पैसेअसे भ्र्ष्ट कारणासाठी वापरले जातातसात्विकता नावालाही नाही. 'सैराट', 'नवीन पोपटअश्या गाण्यांमुळे ध्वनी प्रदूषणपेंडॉल मुळेरस्त्यावर दहा दिवस गैरसोय होतेगंपती च्या उंचीची स्पर्धा सुरु झाली आहेसमाजाचं प्रबोधन होईल असे कार्यक्रम 'अपवादानेदिसतातराजकारण्यांनी समाजाचं 'भिरभिरंकेलंयलोकमान्यांनी सुरु केलेला 'सामाजिक उत्सवइतका प्रदूषित झालाय की - असंवाटतं - परत तो 'घरगुतीस्वरूपात असावामाझ्या काळचा१९६५-७० चाहा बदल म्हणजे माझं दिवस असतानाचं स्वप्नरंजन आहे हेही मला कळतं.*


फार पूर्वी नाही .... अगदी आत्ता आत्तापर्यंत .... सगळं कसं छान होतं .... पण अचानक सर्व 'प्रदूषितझालंयतरीही 'बाप्पा मोरयाम्हणायचं अन पुढचा श्वास घ्यायचा

0/Post a Comment/Comments