तुमच्या मनातील पारिजात

*(तुमच्यामनात फुलाला पारिजात*


मराठी मन हे केवळ फक्त उत्सवप्रिय नसून कविताप्रियही आहे असं मला वाटतंआणि अशी ही कविताप्रिय मने अगदी आपल्याआजूबाजूला असतात हे सोशल मीडियामुळे लक्षात आलंयसादाला प्रतिसाद देणं - तेही काव्यरुपात - हा सर्जनशीलतेचा उच्च बिंदूआहे. 'वेळेवर प्रतिसाद - प्रतिक्रिया सुचणं आणि ती तत्काळ देणंहे जागरूक मनाचं द्योतक आहेब्लॉग वाचायचामनोरंजन करूनघ्यायचे अन  बोलता पुढे जायचे - असं करणारे बहुसंख्य आहेत (यांच्या बद्दल माझी काहीही तक्रार नाही). पण काहींच्या मनात ब्लॉगझिरपतोजेथे ओलावा तेथे अंकुर तर फुटणारसुपीक मन अभिव्यक्त होतंअनावृत्त होतंव्यक्त करण्याची प्रेरणा ही प्रत्येक सजीवालाजन्मतः मिळालेली नैसर्गिक / दैवी देणगी आहेही देणगी वापरली तर वृधींगत होतेमाझा स्वानुभव सांगतोव्यक्त होण्याच्या शक्तीचाउगम मनातील उमटणाऱ्या स्पंदनात असतोउत्पत्तीस्थिती-लय हे 'स्पंदनालासुद्धा लागू आहेम्हणून वेळेवर स्वार होऊन 'स्थिती'असतांना 'काव्यकलेचाअविष्कार होतो


काल मी 'पारिजातही अनुदिनी लिहिली - माझ्या अंगणातल्या फुलांना पाहूनत्या ब्लॉग मुळे काहींच्या डोहातल्या आठवणी वरआल्याकाहींनी कौतुक केले माझ्या ललित लेखनाचेखूप प्रतिक्रिया आल्यापण काहींनी 'कविता रचूनप्रतिक्रिया दिल्या आणिमाझ्या लेखाची दखल घेतलीकाही 'दखलपात्रकाव्य खाली उद्धृत करत आहे - आणि कवींना कौतुकाची पोच पावती देत आहेसगळ्यांची भावना एकच -*दारी असावा पारिजातकाचा सडा

मनी असावा सुगंधी प्रितीचा मळा !*


*विनिता देशपांडे*

व्यवसायाने डॉक्टर आहे - आहारतज्ज्ञफेसबुक सांगतंय की त्यांना फुलांची आवड आहेजुन्या पारंपरिक पोशाख त्यांना आवडतात - त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो नक्की बघानऊवार इरकल साडी आणि पुरुषांच्या डोक्यावर जुन्या टोप्यात्या पारिजातकाबद्दललिहितात ....

*मोहक सुगंध श्रावणातला बहर

पाहता क्षणिक सुखावली नजर

ओंजळीत मावेना मन भरेना

पर्णामागची जणू 'रती '

सजून देखणी द्वारी 

नाजूक नजाकत पारिजातकाची!!*

—————————-

*नंदकिशोर बोधाई*

हे माझे भाऊपूर्वी एम  इंग्लिश केलं आहेलोणी येथील मोठ्या कॉलेजचे प्राचार्य होतेपण 'कवी किंवा तत्समअसं काहीही नाहीमाझा ब्लॉग वाचल्यावर त्यांना कविता सुचलीकंमेंट म्हणून पाठवलीनिवृत्ती नंतर पुणे येथे 'जेष्टांसाठीखूप काम करतातकविता*फुलला पारिजातकबहरले प्रांगण*

 

*निळ्या सावळ्या शांत नभी

गंधभारीत अन् धुंद श्रावणी,

नर्तकीसम नाचत रेशीमधारा 

स्वये मिलनोत्सुक अवघी धरा !


शशांकाच्या मंद निद्रेप्रहरी

पक्षांच्या मंजूळ गायनसमयी,

धवल मुलायम वस्र लेऊनी

हलकेच फुलते सुहास्य गाली !


समुद्र मंथनातील रत्न अनमोल

मिरविते पारिजातक या नामे,

होऊनी लाडके कोमल कुसुमे

अल्पायुषी नसे तू तर चिरंजीवी !


हासरेलाजरे रूप शुभ्र धवल 

सांगे सकलजना मर्म जिवीचे,

घालूनी पखरण नितांतसुंदर 

'उपजे ते नाश पावेसत्य शाश्वत !


त्यागासाठी हे अवघे जीवन

सदासर्वदा रिझवू जनमानस,

 जनकल्याणी झुरणे झिजणे 

असे हीच जगण्याची सार्थकता !*

---------------


माझे ब्लॉग्स वाचून कोणाची 'प्रतिभाजागृत होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं

0/Post a Comment/Comments