येथे कोसळला पारिजात


 *येथे कोसळला 'पारिजात'*


उल्काला नेहमी कविता 'प्रसवानंदपहाटेच्या दरम्यान होतोएक मोठ्ठी झोप झाली की पहाटे साधारणतः तीन वाजता  जाग येते .... मगझोप येण्यासाठी मोबाइलशी खेळ - शब्दांशी खेळ सुरु होतोत्या निरव शांततेत बहुदा शब्द फेर धरून नाचत असावेआजहीतिचीकविता अर्धी झाल्यावर नेमकी मला जाग आलीआज तिने स्नेहस्निग्ध शब्द 'पारिजातकालाअर्पण केले होतेओळी होत्या ....


*प्रभातसमयी पेटविल्या जणू या धुंधुर वाती

हरित पर्णावरी विसावल्या अल्पजीवी ज्योती


हवाहवासा सुखद सहवास निर्लस सर्व काळी

रेख केशरी अष्टगंधित चर्चियले जणू कपाळी


द्वैत-अद्वैत समभाव एकवटला तिज ठायी

अलगद दुरावण्याचा सडा पडे निज पायी*


पुढच्या ओळी येत होत्या. ...


एवढ्यात बाहेर धपकन काही तरी प्रचंड पडल्याचा आवाज आलात्या संततधार पावसात आम्हीं बंगल्याबाहेर आलो आणि बघतो तरकाय .... पारिजातकाचा एक मोठा भाग पावसामुळे उन्मळून जमिनीवर पडलेला आहेआमच्या प्रियजनाच्या आकस्मितअर्धवट आणिबहर आलेला असतांना मृत्यू यावाआम्हीं दोघंही दुःखी झालोघरात आलोपारिजातकाच्या 'स्मरण यात्रेतगुंतलो१९९२ सालीआम्हीं 'सावरकर नगरया जंगलात राहायला आलोआमच्या घरापासून ते थेट गंगेपर्यंत डाळिंबाचे बाग होतेआर्किटेक्ट कॉलनी आणिदोन चार बंगले होते - आमच्या आधीएक दिवस आम्हीं पारिजातकाचं रोप आणलंप्लॉटची आखणी झालेली नव्हती म्हणून अंदाजे हेझाड अंगणात येईल असे लावलेपण नेमकं ते 'प्लॉटिंगझाल्यावर बाहेर गेलाआज तीस वर्षे झालीया पारिजातकाने आम्हांला प्रचंडआनंद दिलात्याने खूप ऊन-पावसाळे पहिले - आमच्याबरोबरपण ... आज उन्मळलाकाही केल्या आमच्या भावनांचं विरेचन होतनव्हतंअसं कसं झालंकालच मी एका फुलं प्रेमी मित्राला सांगत होतो ' आमचा पारिजातक बघ कसा घरात यायचा प्रयत्न करतआहे'. तो हसलाविचित्र हसला - झाड कसं काय घरात येईलत्याची दृष्ट लागली असेल काहोमी अंधश्रद्ध नाहीतरीही माझ्यामनात असा विचार आला याचं मला वैषम्य वाटलंविचारांती मला पहाट झोप कधी लागली हे कळलं नाहीउल्का जागी होतीमोबाईलशी खेळत होती


सकाळी यथावकाश उठलोबाहेर गेलोपरत एकदा मनात शोकएक आक्रंदनमी त्या झाडाला हात लावलाशेवटचा स्पर्शहे हिरवंकलेवर हळू हळू काळं पडेल आणि दोनतीन दिवसात पंचतत्वात विलीन होईलनिसर्गाने निसर्गाचा घेतलेला घासमाझाही शोकपळभरच असेलविचित्र वाटलंअप्रसन्नता मनात भरली होती


चहा ठेवलाव्हाट्सअप उघडलंबघतो तर कायउल्काने भावनांचा निचराविरेचन - कविता करून केला होताकविता चार वाजतापोस्ट केली होतीओळी आहेत .... अशा ...


*लावीयले दारी छोटेसे रोपटे

सजविले त्याने माझे खोपटे


सहवास त्याचा होता दशके तीन

वेचियता फुले असे मस्तक लिन


वर्षानुवर्षे होता सुखदसा सहवास

उन्मळता तूवाटे निर्जन वनवास


बघता बघता झालास तू विशाल वृक्ष

क्षणार्धात उन्मळता अंगण झाले रुक्ष*


तीही पारिजातकाकडे बघत होतीशांत होती. 'शोक-कविताप्रसवून तिला 'मोकळंवाटत असावं. *प्रसिध्द ब्रिटिश कवीWordsworth कवितेच्या  विषयी लिहितो poetry is a spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility.* 


याचा प्रत्यक्ष अनुभव  अनुभुती आलीमी पण ब्लॉग लिहून 'मोकळाहोणारशोकमुक्तसमतोल आणि शांतपारिजातक आठवणीत'चाललाआहेक्लायमेट चेंज झालं


पोकळी निर्माण झाली आहे तेथेपण 'झाले मोकळे आकाश'. *सकारात्मक भावना रूजवण्याचा अर्थ नकारात्मक भावनांना दाबूनटाकणे असा होत नाहीत्यांचा निरोगी मार्गाने निचरा होऊ देणे हेही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहेश्वास थांबेपर्यंत.*

0/Post a Comment/Comments