मिंटो - एक समीक्षा

 *(पाकिस्तानी कीभारतीय 'मंटो'*केवळ सुहासने सुचवले म्हणून मी 'मंटोया लेखकावर आधारित दोन चित्रपट बॅक टू बॅक बघितलेपहिला पाकिस्तानी चित्रपट सर्मदखूसाद यांनी दिग्दर्शित केला तर दुसरा भारतीय दिग्दर्शक नंदिता दास यांनीनंतर गप्पा मारतांना मी सुहासला सांगितलं - मी दोन्हींचित्रपट पाहिलेमज्जा आलीदुसरा बघितल्यावर 'मंटो' - वादग्रस्त लेखक - जरा जास्त समजला'. या वर सुहास विचारता झाला - कोणता जास्त आवडलाया प्रश्नाला मी प्रदीर्घ उत्तर दिले - उभ्या उभ्या - कारण सुहास हा उत्तम रसिक आहे आणि आम्हीं 'वरच्या वेव्हलेंथवर संवाद साधू शकतो


*मी म्हणालो 'सुहृद सुहासइंडस नदीने कसा अविष्कार करावा हे ब्रह्मपुत्रेनं सांगू नये आणि 'व्हाइस वर्सा'. किंवा पिकोसाच्या चित्रांचीतुलना व्हॅन गॉग च्या चित्रांशी करू नयेसमीक्षा झाली पाहिजे - तुलना नाहीकारण कोणतीही कलाकृती हा 'स्वतंत्र अविष्कारआहे -  कलाकाराचा परिप्रेक्ष्यदृष्टिकोन हा खूप वेगळा असू शकतो - विषय जरी एक असला तरीतुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे - मला दोनीहीचित्रपट भावलेआवडलेउगीच तुलना करून 'रसभंगव्हायला नको*. सुहासला उत्तर पटलं असावं कारण त्याने सुद्धा एकाच विषयावरअनेक सिनेमे बघितले आहे


खरंतर विषय संपला होता तरीही मी सुहासचा प्रश्नावर विचार करत होतोसमीक्षा तर झालीच पाहिजे जेणेकरून रसग्रहण केल्याचंसमाधान होईलसमीक्षा म्हणजे केवळ टीका नव्हेटीके मध्ये एक नकारात्मक सूर असतोबरेचसे दोष दिग्दर्शनच असतेम्हणूनचित्रपट समीक्षकेत सर्जनशीलता असायला हवी - सकारात्मकता हवीम्हणजे दोन्हीं चित्रपटात 'चांगले', 'वेगळेकाय होते हे सांगणे


*पाकिस्तानी 'मंटो लेखक कोणत्या 'मानसिकतेतूनजात असतो याचा अप्रतिम उहापोह केला आहे. 'गोष्ट लिहिणं अन सांगणंहेकिती त्रासदायक असतं हे समजतं / उमजतं. (येथे मला संजय दत्त आणि ऐश्वर्या यांचा 'शब्द ' सिनेमा आठवला.) या सिनेमात'नूरजहाँफार सुंदर रेखाटली आहेतिचा अदब आणि लकब - वा क्या बात हैउर्दूचा वापर अत्यंत चपखल आहे - संपूर्ण सिनेमा हापाकिस्तानात घडत आहे.*


भारतीय 'मंटोहा नंदिता दास यांनी रंगवला आहेतांत्रिक दृष्ट्या अतिशय उत्तममंटो यांचा प्रवास - हिंदुस्तानातून पाकिस्तानातदाखवला आहेपण नंदिताने 'नुसतीकथा सांगितलीमंटो चं अंतरंग नाही रंगवलंत्या ऐवजी मंटो चा सर्वात गाजलेला खटला उत्तमप्रकारे दाखवलाअगदी 'अर्ग्युमेण्टसहित. (https://youtu.be/DAF7qSgjUW4मंटो यांनी हिंदुस्थान का सोडला याचीकारणमीमांसा खूप उत्तम केली आहे


म्हणून म्हणतोमला दोनीही चित्रपट आवडलेचित्रपट 'संपल्यावरप्रत्येक रसिकाने (?) स्वतःला विचारलं पाहिजे - हा चित्रपट मलाका आवडलाअसो


https://youtu.be/7iMUh8mWB20 - पाकिस्तानी मंटो

0/Post a Comment/Comments