पारिजात*पारिजात*


रुख्मिणी आणि सत्यभामा आमच्या घरी येतात पण त्यांची पारिजातकाच्या फुलांवरून भांडणं होत नाहीआमचा पारिजातक घराबाहेरअसला तरी फुलं घरात पडतातदिवस उजाडायला लागला की या दोघी येतात वेचायला ती पांढरी 'स्फटिकं'. स्फटिक म्हणजे अशीघन वस्तूजिच्यामधे अणू-रेणूंची एक ठरावीक संरचना तिन्ही मितींमधे पुनरावृत्तीत होतेभगव्या आणि पांढऱ्या रंगात निसर्गाने अविष्कारकेला की 'शब्दरुंजी घालू लागतात - कधी कवितेत तर कधी कथेतकधी व्यक्त होतात तर कधी अव्यक्त राहतातकधी नजरेलानजर देतात तर कधी नाकात दरवळतातमाझ्याशी तर ते बोलतातपण हे सगळं अनुभवण्यासाठी दारात 'पारिजातलावला(पाहिजेअगदी कुंडीत लावाअन नंतर त्याच्यातील ऋतुमानानुसार बदल पहानिष्पर्ण झालेला पारिजात ते फुलांचा श्रुंगार केलेलापारिजातऋतुरंग आम्हीं 'रागरंग' - आमच्या घराचे नाव - येथे अनुभवत असतोनित्याने आणि नियमाने


*फुलं वेचण्याचा निम्मिताने या दोघी येतात तेंव्हा माझी बाहेर पडायची वेळ असतेयांना बघितलं की मी थांबतो - ते नाट्य बघतोपारिजातकाच्या फुलांवरून असलेली मनातली अढी अजूनही तशीच आहेत्या वृत्ती आहेतरुख्मिणी साधी आणि सरळ आहेजमिनीवर पडलेल्या सड्यातुन ती फुलं वेचतेआपली पर्डी भरतेपण सत्यभामा .... वेगळी आहेपारिजातकाचं फुल जेव्हा खाली पडतअसते तेंव्हा ती ते मोठ्या चपळाईने पर्डीत घेतेतिच्या पर्डीतली फुलं - कुणाचाही स्पर्श  होता देवांच्या चरणावर विलीन होतातयामुळे सत्यभामा मला जरा 'शहाणीवाटतेएक मात्र आहेदोघी कितीही भांडल्या तरी स्वर्गातून येतात बरोबर आणि जातातही बरोबरउरलेली फुलं उल्का वेचते आणि तिची पूजा संपन्न होते.*


खऱ्या अर्थाने ही फुलं 'क्षणभंगुरआहेपण मला त्याचं वाईट वाटत नाहीकारण ही फुलं चिरकाल टिकली तर रुख्मिणी आणिसत्यभामा दररोज येणार नाहीत्यामुळे आजची फुलं कोमेजली की मी उद्याच्या सकाळीची वाट पहातोमला हेही माहित आहे कीभाद्रपद लवकर संपणार आहेअसोया फुलांना कोरल जास्मीननाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्रफुलामुळे *'ट्री ऑफ सॉरो'* असेही नाव आहेही फुलं मला गंभीर वाटतातचातुर्मासात लक्ष फुले वाहण्याचा संकल्प करणा-या माझ्याआईला आणि आजीला ही फुले प्रिय वाटतातलहानपणी मी हजारो फुलं वेचली आहे आणि मोजली आहेतफुलं वेंचतांना आणिमोजतांना केशरी रंग हाताला लागायचाआजही त्या आठवणी आल्या की मन पुनश्च 'भरूनयेतेरात्रीच्या काळोखात ह्या मोत्याच्याकळ्या उमलतात ... 


*‘आज अचानक असे जाहले
सांजही भासे मला सकाळ
प्राजक्ताच्या आसवंत सखि
सवें मौक्तिकें आणि प्रवाळ !’
कवी बा..बोरकरांनी ह्या फुलांचे समर्पक वर्णन केले आहेपण मला ही कविता अजिबात कळली नाहीकोणी समजावेल का मला ? काहीतरी अनवट लिहिलं आहे साध्या फुलांविषयी.*


अशी आहे आजची रम्य सकाळथोड्याच वेळात शेअर मार्केट सुरु होईल आणि 'रम्यतासंपेल


 

0/Post a Comment/Comments