मन - तरंग


 *सिनेमासाठी -'मनतरंग'*


कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की ) सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने नासिक येथे 'मनतरंगहा फिल्म क्लब सुरु झालेला आहेते मन-व्यवस्थापन मार्गदर्शक आहेतुम्हांला ते माहित नसतील तर तुमचे मन-आरोग्य चांगले आहेअसे समजात्यांची तुम्हांला कधीही गरज पडू नये अशी शुभ इच्छा सुद्धा प्रगट करतोहल्ली मी त्यांच्या संपर्कात आहेकारणकाळजीकरू नका - मी 'स्वस्थआहेमी 'निरामयआहे


*आशयपूर्ण सिनेमा बघितला तर मानसिक आरोग्य चांगले राहते असं त्यांना 'प्रयोगांतीवाटतं.* मनतरंग फिल्म क्लब ठाण्यात खूपदिवसांपासून चालू आहेनासिकमधेही आता आई एम  हॉल मध्ये महिन्यातून एकदा शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जातातप्रत्येकफिल्मनंतर त्यावर चर्चा होतेमानसोपचार तज्ञ आणि सिनेमा तंत्राची माहिती असणारे सूत्रसंचालक 'विषयावरप्रकाश टाकतातमलासिनेमा जरा जास्त कळतो असं मन-तरंग संचालकांना वाटलं अन त्यांनी मला 'अधिक प्रकाशटाकण्याची संधी दोनदा दिलीमागच्यावेळी थीम होती 'निनावी नातीचार फिल्मस पैकी दोन फिल्मस ची लिंक देत आहेनक्की बघाबोध होतो का तेही बघा. ( https://youtu.be/3-PXNnaatx4 ; https://www.youtube.com/watch?v=LatobRtLukM )


कोणताही सिनेमा हे लोकवाङ्मय असतं असं मी मानतोफक्त शब्दांच्या ऐवजी चित्र - इमेजेस वापरल्या जातातह्या 'गोष्टसांगण्याच्याप्रकारामध्ये संगीत वापरलं जातंजसं काही वाङ्मय सवंग असतं तसं काही सिनेमे सुद्धा सवंग / निकस असतात - फक्तमनोरंजन करतातपण मी सिनेमा 'मनोरंजनापलीकडेकाही मिळतंय का हे बघत असतोप्रोटोगॉनिस्टच्या - नायकाच्या दृष्टिकोनातूनसिनेमा बघत 'त्याचंचआयुष्य मी दोन तासांकरता जगतोहि एक बौद्धिक प्रोसेस आहेप्रत्येक आशयपूर्ण पुस्तक अथवा चित्रपटकाहीतरी सांगत असतोविचारांचे प्रवर्तन करत असतोआपण किती संवेदनशील आहे ते बघावंएक मात्र खरंआपण काय वाचतोआणि बघतोयावर आपली मानसिक जडण आणि घडण होत असते - सूक्ष्म पातळीवरअनावधानाने


*खरं तर भारतीयांना 'सिनेमा का  कसा बघावाहेच सांगितलं जात नाही - कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावरचित्रपटाच्या अनेक'मितीअसतात त्याचं आपल्याला भान नसतंमग आपण बाजारू चित्रपटास 'बळीपडतोसकस कथागूण असलेले चित्रपट बघितलेनाही की 'अभिरुचीनिर्माण होत नाहीभारतीय पॅरललनिओ-क्लासिकलवास्तववादी चित्रपट पहिले की बऱ्याच वेळा -सवेंदनशीलमन भानावर येतंमग सत्यजित रे ते सुमित्रा भावे व्हाया NFDC असा प्रवास व्हायला हवागोष्टी किती विविधतेने सांगितल्या जातात हे'पाहूनमन अचंबित होतेपुढचा प्रवासअर्थात आंतरराष्ट्रीय सिनेमाही वाटचाल 'हॉलिवूडटाळून केली तरी चालतेआणि मगसमजतं की किती वेगळ्या प्रकारच्या 'गोष्टीघडतातवर्ल्ड सिनेमा अद्भुत आहेजर्मन आणि फ्रेंच सिनेमा फ्यूचरिस्टिक आहेइराणीसिनेमा सद्य परिस्थिती दाखवतोआफ्रिकन सिनेमा आपल्या कल्पनेपलीकडे आहेचायनीज आणि जापनीज सिनेमा ..... संपूर्ण जगतुमच्यासमोर उलगडलं जातंजागतिक सिनेमा संस्कार हवेसे वाटतात आणि मग फिल्म फेस्टिवल ची आस लागतेअक्षुण्ण अमृताचाझरा म्हंजे 'फेस्टिवल - उत्सव सिनेमाचा'. दररोज चार पाच सिनेमांचा 'रतीबसहा दिवसांसाठीत्यात तेथे सिनेमावर चर्चा होतेहेम्हणजे 'अमृतात चेरी🍒’.* मी तर खूप भाग्यवान आहेचित्रपट तज्ञ - रघु फडणीससुहास भणगेगजानन ढवळे आणि आशिष चव्हाणमाझे मित्र आहे - तासंतास आम्हीं सिनेमावर चर्चा करतो


*तर .... सिनेमा पाहून आपल्या मनात काय तरंग उठले आहे हे बघण्यास यासिनेमा परीक्षण करूसिनेमा विविध अंगानी समजून घेऊचित्रपट समीक्षा करू - चित्रपटाचे आणि चित्रपटमाध्यमाचे मनोरंजनकलात्मक सौंदर्यशास्त्रसामाजिक  सांस्कृतिक पैलूचित्रपटतंत्रे आशयविषयक घटक यांच्या कसोट्यांवर केलेले विश्लेषण  मूल्यमापन करू.*

0/Post a Comment/Comments