मदत पाहिजे


 *मला () पाहिजे!*


*प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञव्हिक्टर फ्रॅन्कल म्हणतात ~ समोरची घटना आणि त्यावर आपली प्रतिक्रिया या मध्ये एक स्पेस असतेज्यात असतो आपला चॉइस*


आजी निघून गेल्या आणि मी अपराध्यासारखं बघत उभा राहिलो ... आज


*पंधरा दिवसांपूर्वी*

एका आटपाट नगराच्या उपनगरात मी राहत आहेमाझ्या घराच्या आजूबाजूला सुसंस्कारीत आणि सुबुद्ध लोक राहतात असा माझासमज मी आणि उल्का कट्ट्यावर सकाळी सकाळी चहा पीत बसलो होतोतेव्हढ्यात एक आजी समोरून चालत जात होत्याकिंचितलंगडत होत्याउल्काने त्यांना सहज हटकलं - काहो लंगडतायतर त्यावर काहीही  बोलता त्या कट्ट्यावर आल्याआम्हीं त्यांना खुर्चीदिलीपरत तोच प्रश्न - काहो लंगडतायआणि इतर काही अनुषंगाने आणखी काही प्रश्न


आजी खुर्चीत बसल्या की कोसळल्या हे मला समजलंच नाहीकारण त्यांच्या डोळ्यातील पाणी बघताच क्षणी माझे डोळे पाणावलेआणि 'दृश्य धूसर झाले'. आजी बोलू लागल्या. 'काय सांगू ताईगुढगे लई दुखत आहेमागच्या महिन्यापर्यंत मी माझं धुणं करायचेपण आता होत नाहीशहात्तर वर्ष झालीया पोराकरितासुनाकरीता काय नाही केलंपण आता अजिबात लक्ष देत नाही माझ्यादुखण्याकडेडॉक्टरकडे नेत नाहीत्यांना भीती वाटते - डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं तरमुलगा तर म्हणतो - अशीच मरून जाशील तू , करोनात नाही का लोक गेले'. आजींचा आवाज जड झाला. 'मुलगा काय करतो?' - मी विचारलंआज्जी म्हणाल्या 'शिक्षक लोकांनातो शिकवतो'.  उल्काने चहा दिलामी आजीला म्हणालो 'बघतोगुरुजी रुग्णालयात काही करता येतं का !' नंतर आजी निघून गेल्या..... दुःख मागे सोडून


नंतर उल्काने मला अधिक माहिती पुरवलीया आजी आमच्या मागच्या रो हाऊस मध्ये राहत होत्यादोन महिन्यांपूर्वी थोड्या दूरच्या रोहाऊस मध्ये गेल्या - मुलानं रो हाउस घेतलं म्हणे


माझ्या मनात आजींना कशी मदत करता येईल यावर विचार करू लागलोगुरुजी हॉस्पिटल मधील एक उच्चपदस्त मित्राला फोन केलाकाही करता येईल का हे विचारलंमित्र म्हणाला 'फ्री ट्रेंटमेन्ट तर होणार नाही पण बघू काही करता येईल का!'. 


*दहा दिवसांपूर्वी*

आजी सकाळी घरी आल्यामी कट्ट्यावर बसलेला पाहूनविचारत्या झाल्या 'भाऊ विचारलं का रे हॉस्पिटल मध्येगुढघे खूप दुखतआहे.' मी सांगितलं 'डॉक्टर भेटले नाही अजूनभेटले कि सांगीन तुम्हांला'. खोटं बोललो मीउल्काही दिग्मूढ झाली होती माझ्या उत्तराने.


मला व्हिक्टर फ्रॅन्कल आठवलाआजींना मदत करण्याच्या 'प्रतिक्रियेतमी माझी 'सीमातर ओलांडत नाही नाअसा प्रश्न त्रास देऊलागलाआजींना मदत करतांना मुलाला समजणारमग तो म्हणाला 'आमच्या कौटुंबिक बाबीत तुम्हीं लक्ष घालू नका', की सर्व संपलंमुलगा आजीला आणखी छळेलमला चॉईस करता येईनाम्हणून मी खोटं बोललोदोन तीन मित्रांशी बोललोउल्काशी बोललो


विचारांती असंही लक्षात आलं की आपल्याला फक्त 'आठ आणेबाजू माहित आहे - आजी जे सांगत आहे त्यावरूनपण मुलाचीबाजूमाहित नाहीकधीही माहित होणार नाहीम्हातारी माणसंही विचित्र वागतात - हा माझा स्वानुभव आहेमी ही 'अतर्क्यवागतोकी कधी कधी. 'दुसरी बाजू' - उरलेले आठ आणे - माहित नसतील तर ....


चर्चेअंती असं ठरलं की 'मदत करायचा विचार सोडून द्यायचा'. मनातून वाईट वाटत होतं पण काहीही करता येत नव्हतं


*आज सकाळी*

दहा दिवसानंतर आजी घरावरून चालल्या होत्यामला बघितलंमला त्यांची नजर चुकवता नाही आलीमी 'अपराध्यासारखात्यांच्यासमोर उभा राहिलोतेव्हढ्यात उल्का बाहेर आलीआज्जी बोलू लागल्या -'काल गेलत्ये गुरुजी मध्येतपासलं डॉक्टरांनीऑपरेशनकरावं लागेल म्हणे'. हे ऐकताच माझ्या मनावरील ताणभार कमी झालाउत्साहाच्या भरात मी विचारलं 'मग कधी करणार ऑपरेशनखर्च किती?'.


आजी म्हणाल्या - 'खर्च ऐन्शी हजारमुलानं सांगितलं - येव्हढे पैसे नाही माझ्याकडेऑपरेशन नाही करायचंघरातच बसून रहा .... आणि जाशील ......' आजी घराकडे चालू लागल्यामी आणि उल्का त्यांच्याकडे पाठमोरं सुद्धा पाहू शकत नव्हतो


कट्ट्यावर परत आलोरिकाम्या खुर्चीकडे बघितलंआजी कधीच बसणार नाही या खुर्चीत


माझं काही चुकलं काहोआपल्या बाजूला सुबुद्ध लोक राहतात या 'समजेलातडा गेलाकिंबहुना मनात भूकंप झाला. 'असं कसं होऊशकतं?' - हाच विचार मन पोखरत आहे


*व्हिक्टर फ्रॅन्कल ने सांगितलेली 'स्पेसवांझ राहिलीसमाजसेवा अवघड असतेकधी कधी ती  करण्यात शहाणपण असतं.*

0/Post a Comment/Comments