नातवाची परवानगी घेऊन मी त्याच्या सायकलवर टांग मारली. वहिनीकरीता चहा घेतला आणि हास्पिटल मध्ये पोहचलो. चहा घेतांनावहिनींनी सांगितलं - 'आज डीसचार्ज मिळणार आहे. दादांना दुपारी घरी घेऊन जाऊ'. मी म्हटलं 'बरं झालं, घरी गेल्यावर सण असल्याने, दादालाही बरं वाटेल, मनाला उभारी येईल'. वहिनींची प्रतिक्रिया 'हो ही नाही अन नाही ही नाही'. किंचित पाणी डोळ्यात तरळलं. माझ्याभावाच्या घरी 'वेदनामय आनंदाची' दोरीवरची कसरत चालू होती, आज दसऱ्याच्या दिवशी. तरी बरं घरात 'घट' बसले आहेत. मनातविचार आला - दुखं, वेदना यांना वेळ काळ नसतो. सहज बघितलं तर - हॉस्पिटल 'गच्च' भरलं होतं, ICU सहित. सर्वव्यापी, omnipresent ... दुखं.
सकाळी घरी परततांना, लाऊडस्पीकर मधून लाऊड आवाज रस्त्यावर ऐकला. बघतो तर येथेही 'दोरीवरच्या' कसरीतेचे दुकान मांडलेहोते. कुटुंबात पाच जण - नवरा, लेकुरवाळी अन तीन लेकरं. मोठया मुलाचं काम - दोरीवरून चालायचं. बापाचं काम - मुलगा बॅलन्ससांभाळतो कि नाही हे बघायचं. आईचे काम - परातीत पैसे गोळा करणं. लेकराचं काम - आईचं दूध पिणं. दुसरं लेकरू - उघडं नागडं - रस्त्यावर रांगत होतं. रस्ता वाहत होता. पण काहीजण 'हा' खेळ थांबून पहात होते. काहींना वेळ नव्हता तरी थांबत होते, एखादी नोट देतहोते आणि लगेच पुढे जात होते. नोट देणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. बरं नोट देणारे खूप 'श्रीमंत' होते असंही नाही. एकही चारचाकीवाला थांबला नाही! माझ्याकरता 'हे' दृश्य 'विलोभनीय' होतं का? मी 'रेंगाळलो' तेथे, शूटिंग केलं. मनात तरंग उमटतहोते. या कुटुंबाला आज 'दसरा' आहे हे माहित आहे का? आयुष्य जगण्यासाठी जी कसरत करावी लागत आहे त्याला कुटुंबप्रमुखजबाबदार आहे - तीन मूलं !? - याची जाणीव त्याला असेल का ? अस्थायी कुटुंबाचे प्रश्न? खूप श्रीमंत राहत असलेल्या 'नयनतारा' सोसायटीच्या गेट समोर हे 'नयन मनोहर' दृश्य मी अनुभवत होतो. लांबलचक BMW ला बाहेर पडायला अडचण होणार होती हे नक्की. तेव्हढ्यात गार्ड म्हणाला -'साहेब सायकल थोडी पुढं घ्या'. मी घेतली.
आर्थिक विषमता जाणवली. पण दसऱ्याच्या दिवशी 'आनंदाची विषमता' पण जाणवली. माझ्या भावाकडे 'तणावमिश्रित आनंद' आहे तरमाझ्याकडे 'आनंद' आहे. रस्त्यावरील कुटुंबाला तर 'आनंद' म्हणजे काय .. हेच माहित नसावं.
सगळीकडे 'दोरीवरील' कसरत.
आमच्या घरासमोर बंगला तयार होत आहे. मजूर लोक आपल्या 'हत्यारांचा' सन्मान करत आहे हे बघून बरं वाटलं.
दसरा किंवा विजयादशमी हा भगवान रामाचा विजय किंवा दुर्गा पूजा म्हणून साजरा केला जातो, दोन्ही प्रकारांमध्ये हा शक्ती-पूजेचासण आहे, शस्त्र पूजेची मुहूर्त आहे. हा आनंद आणि विजयाचा सण आहे. दसऱ्याचा सण दहा प्रकारच्या पापांचा त्याग करण्याची प्रेरणादेतो- वासना, क्रोध, लोभ, मोह, वेडेपणा, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी.
दसरा. हार्दिक शुभेच्छा. घरी आलो तर , अनाहत देवीचं चित्र काढत होती. मस्त वाटलं. सर्व वेदनांचा मला विसर पडला.
सुख दुःख कोणालाच चुकलेले नाही..सुख आलेले कळते पण ते असलेला काळ कधी ओसरला ते कळत नाही. दुःखाचे असे नाही. ते आलेले कळते, बोचते व जाता जात नाही असे वाटते. तुमच्या माझ्या वयाच्या माणसांनी दोन्ही वेळी मनाचा संतुलिपणा टिकवायला हवा एव्हढे नक्की. सुखाच्या काळात काहीच करायचं नाही..फक्त एन्जॉय करायचं पण दुःखाच्या काळात हेही दिवस जातील अशी अपेक्षा करायची आणि मुख्य म्हणजे कोलमडून जायचं नाही कारण त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही.
ReplyDeleteही प्रतिक्रिया कृष्णा दिवटे यांची आहे
Deleteसुख दुःख कोणालाच चुकलेले नाही..सुख आलेले कळते पण ते असलेला काळ कधी ओसरला ते कळत नाही. दुःखाचे असे नाही. ते आलेले कळते, बोचते व जाता जात नाही असे वाटते. तुमच्या माझ्या वयाच्या माणसांनी दोन्ही वेळी मनाचा संतुलिपणा टिकवायला हवा एव्हढे नक्की. सुखाच्या काळात काहीच करायचं नाही..फक्त एन्जॉय करायचं पण दुःखाच्या काळात हेही दिवस जातील अशी अपेक्षा करायची आणि मुख्य म्हणजे कोलमडून जायचं नाही कारण त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. ...कृष्णा दिवटे
ReplyDeletePost a Comment