निग्धमयी दूध(वाला)
'माझा दूधवाला' असा निबंध मला लहानपणी लिहायला सांगितला असता तर मी लिहिले असते 'माझ्या दुधवाल्याचे नाव शिवा आहेकारण शिवाला - शंकराला दूध फार आवडते. मला शिवा आवडतो कारण तो दुधात कमी पाणी टाकतो. मुख्य म्हणजे त्याच्या दुधालाजाड अन भरपूर साय येते. त्यामुळे आमची आई घरीच तूप तयार करते. मला आमचा दूधवाला खूप आवडतो.'
आज मी दूध आणावयास बाहेर पडलो - कुडकुडत. शिवाकडे पोहचलो अन लगेच चहाची ऑर्डर दिली. तिशीचा माझा दूधवाला कायमहसत दूध देत असतो म्हणून मला आवडतो. दोन वर्षांपूर्वी त्याने दुधाचं टेबल आमच्या कॉलनीत थाटलं तेंव्हा एक बोर्ड लावला होता. त्याबोर्डवरील मजकुरामुळे मी त्याचा 'ग्राहक' झालो. बोर्डवर लिहिलं होतं - 'दूध रु ६० लिटर : आम्हीं उन्हाळ्यात दुधाचे भाव वाढवत नाही.' असो. हसणारी माणसं मला आवडतात त्यामुळे आमच्यात 'शिवरंजनी' राग फुलू लागला. आमच्या वयात ३० वर्षांचे अंतर असले तरीआमची मैत्री चंद्रकलेप्रमाणे वाढत गेली. शिवा नेहमी 'काहीनाकाही प्रश्न' विचारत असतो. मी जमेल तेव्हढी उत्तरं देतो. मी कधीही त्याला'राम राम शाम शाम' करत असतो - सकाळ दुपार संध्याकाळ. उभ्याउभ्या भरपूर चकाट्या पिटीत असतो.
आजही सकाळी सकाळी चकाट्या पिटायच्या उद्देशाने मी त्याला चहा ठेवण्यास सांगीतला. काल शेअर मार्केट खड्ड्यात गेल्याने आजमला घाई नव्हती. गप्पा सुरु झाल्या. थोडंसं व्हिडीओ शूटिंग घेतलं. हे बघून इतर ग्राहक 'हसत' होते, 'हासत' होते - माझे वेडे चाळे बघून. त्यांच्या मनातला विचार - 'दुधवाल्याचं कोणी शूटिंग घेतं का?'. असो. जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे विचार करतो.
गप्पा मारतांना असं लक्षात आलं की माझ्या शिवाचं नाव शिवा नसून शिवा त्याच्या मुलाचं नाव आहे. दुकानाचं नामकरण 'मुलाच्यानावानं'. सहज चौकशी केली - तर रवींद्र आव्हाड उर्फ दूधवाला म्हणाला - की आमचे आजोबा १९७२ मध्ये सिन्नरवरून नासिकला आले. त्या काळी सिन्नरला मोठा दुष्काळ पडला होता. घर नाही अन दार नाही ... अशा अवस्थेत दिवस काढले ... मग त्याने त्यांचा इतिहाससांगितला ... व्हिडीओ बघा मग समजेल. रविंद्र रचना विद्यालयाचा विद्यार्थी असल्याने माझी अन त्याची 'नाळ' जुळली - गप्पात. मीसाबणे-पटवर्धन-लिमये बाई यांचा उल्लेख केला तर म्हणाला - सर यांची मी नावं खूप ऐकली आहे. शाळांच्या गप्पा झाल्यावर कौटुंबिकगप्पा सुरु झाल्या. रवींद्रचे तेंव्हाचे 'दुष्काळ ग्रस्त' आजोबा आज 'सधन' आहे. बोलता बोलता दुधवाल्याने मला त्यांच्या 'प्रॉपर्टीची' यादीदिली. सातबारे, फ्लॅट्स अन प्लॉट्स सर्वदूर पसरलॆले होते. तीन पिढ्यांचे कष्ट असे त्याने मोजून दाखवले.
अचानक रवींद्र विचारता झाला - बाबा, फॉरीनला कामाकरता कसं जायचं असतं? मी त्याला सविस्तर सांगितलं तर त्याला आश्चर्यवाटलं. माझ्या विषयीचा आदर अन 'कवतिक' मला त्याच्या डोळ्यात प्रश्नासह दिसलं. त्याने विचारलं - बाबा तुम्हांला एव्हढं कसं कायमाहित? ..... मग काय .... माझ्या कथावर कथा सादर झाल्या, थोडक्यात. ऐकणारे मिळाले की 'कथेकरी' खुश होतात. मी त्यालाविचारलं - तू कशाला चांभारचौकश्या करतो? तर तो म्हणाला - 'माझी लै ईच्छा हाये फॉरीनला जायची'. मी मनातल्या मनात 'डोक्यालाहात लावला' आणि विषय आटोपता घेतला. रवींद्र दुसरा चहा 'घ्या' म्हटला आणि मी घेतला - तीस ml - कागदी कप. तेव्हढ्यातआठवलं - उल्का चहाविना व्याकुळ झाली असेल. 'चहा कट्ट्यावरून' एक्झिट घेतली.
आज मी माझ्या 'त्या जुन्या' निबंधाचा शेवट असा करतो. 'माझा दूधवाला लै गोड आहे. तो स्वतः दूध पित नसल्याने मला चहा पाजतो. मी त्याला 'गुंतवणुकीचे सल्ले' देतो. दररोज बाराशे लिटर दूध विकणाऱ्याला 'परदेशात मजुरी' करायला जाऊ नको असे सांगणार. माझादूधवाला मला खूप आवडतोकारण तो 'स्निग्धमयी' आहे. दुधावर साय खूप आहे.'
*जगात इतरत्र सर्वत्र स्नेह सांडलेला आहे, तूप सांडलेलं आहे .... ते वाकडी वाट अन बोट करून काढता आलं पाहिजे.*
भारी...दूध वाला
ReplyDeletePost a Comment